शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार शहर दौऱ्यावर
लोकवार्ता : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उद्या (शुक्रवार ३) पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर देणार आहेत. विविध विकास कामाच्या उद्घाटाने करण्यात येणार असल्यानं अजित दादांचा दौरा पुण्याच्या दिशेने रवाना होई. सकाळी साडेसात पासून अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरवात होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या विकास कामाचे उदघाटन अजित दादांच्या हस्ते होणार होते. परंतु भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे अजितदादांनी सर्व दौरे रद्द करून भाऊंच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली होती.
त्यामुळे राहिलेल्या विकास कामांचा उदघाटन सोहळा उद्या अजित पवारांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे. महापालिका मुख्यालयातील उद्योग सुविधा कक्ष, सीएसआर सेलचे उद्घाटन, पोलिसांना पेट्रोलिंगकरिता 50 स्मार्ट बाईकचे हस्तांतरण, ग्रीन मार्शल पथकाकरिता हॅण्ड हेल्ड डिव्हाईसचे वाटप, 6 फायर मोटार सायकल्स अग्निशामक विभागाला अजित पवार यांच्या हस्ते दिल्या जाणार आहेत. सकाळी साडेसात ते सव्वाआठ या वेळेत हे कार्यक्रम होणार आहेत.
साडेआठ वाजता सीएमई येथील रोईंग प्रशिक्षणाचे उद्घाटन व पाहणी करणार आहेत. सव्वानऊ वाजता भोसरीतील सखुबाई गवळी उद्यानातील बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. पावणेदहा वाजता नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील हॉकी अकडमीचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सव्वादहा वाजता अजितदादा चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देणार असून पाहणी करणार आहेत. पावणेअकरा वाजता तळवडे जॉगिंग ट्रॅक, उद्यानाचे उद्घाटन करणार आहेत. तेथून सव्वाअकरा वाजता भक्ती-शक्ती येथील इको ट्रॅकचे भूमीपूजन करणार आहेत.
पावणेबारा वाजता थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी येथील पॅव्हॅलीनचे उद्घाटनही अजितदादा करणार आहेत. त्यानंतर एक वाजता वाकड येथील के. तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानाचे उद्घाटन, पिंपळेसौदागर कुणाल आयकॉन रोड अखिल भारतीय कबड्डी पंच स्वर्गीय बाळासाहेब बाजीराव कुजीर क्रीडांगणाचे उद्घाटन तसेच पिंपरी -चिंचवड महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामाच्या भूमीपूजनानंतर प्रशासकीय कार्यक्रमांची सांगता होणार आहे.