“अजित पवारांना आयकर विभागाची नोटीस”
किरीट सोमय्यांनी केलेल्या गंभीर आरोपाच्या दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाची अजित पवारांना नोटीस.
पिंपरी। लोकवार्ता-
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने अजित पवारांना नोटीस पाठवली आहे.पवारांच्या मालमत्तावर कारवाई करण्यासंदर्भातील नोटीस अजित पवार यांना पाठवण्यात आलं आहे. कालच किरीट सोमय्या यांनी अजित पवारांकडे एक हजार कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे गंभीरआरोप केले होते. या प्रकरणामध्ये सोमय्या यांनी अजित पवारांची आई, पत्नी आणि पवार कुटुंबियांच्या जावयाचाही हात असल्याचा आरोप केला होता.

मी दिवाळीनंतर फटाके फोडणार होतो, पण पवार साहेबांना खूपच घाई झालीय, असं म्हणत तीनही जावयांचा घोटाळा समोर आणणार असं म्हणालो होतो त्याप्रमाणे आज आपण पवारांचे जावाई मोहन पाटील यांच्या मार्फत झालेल्या व्यवहारांबद्दल भाष्य केलं होतं. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी आलेले हे पैसे बिल्डरांनी दिले आहेत. हे सर्व सर्व त्यांनी कुटुंबियांच्या खात्यात गेल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.अजित पवार यांनी स्वत:च्या आईच्या खात्यातही हे पैसे वळवले आहेत.असा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी केला आहे.आयकर विभागाने पाठवलेली नोटीस हा ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.