अजितदादांचा पोलिसांना तब्बेती कमी करण्याचा सल्ला
पोलीस आयुक्तालयातील डीसीपी डॉ. काकासाहेब डोळे यांना खास सल्ला.
पिंपरी । लोकवार्ता
अजितदादांच्या शिस्त आणि स्पष्ट बोलण्यासाठी स्वभावाला कोण ओळखत नाही म्हणा.. वारंवार चर्चेत असलेले अजित पवार यांचा एक विडिओ चांगलाच वायरल होताना दिसतोय … अजित दादांना एखादी गोष्टी चुकीची वाटली तर पुढचा मागचा विचार न करता जागेवरच स्पष्ट आणि तोंडावर बोलण्याची त्यांची सवय आपण सावर्णि कित्तेक वेळा पहिलीच असेल . आजही असाच काहीसा प्रसंग घडला उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवडच्या दोऱ्यावर असताना त्याच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिसांना पेट्रोलिंगचे वाटप करण्यात आले.

यावेळी पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे हे बाईकची किल्ली घेण्यासाठी गेले असता अजित पवारांनी हसत हसत तब्बेत कमी करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोऱ्यात अजित पवारांनी तळवडे – जॉगिंग ट्रॅक व नव्याने विकसित केलेल्या उद्यानाचे उद्घाटन केले. याबरोबरच पिंपरी महानगरपालिकेने उभारलेल्या हॉकी अकॅडमी उद्घाटन उघटनहीत्यांनी केले. यावेळी हॉक्की खेळण्याचा आनंदही त्यांनी लुटायला, तसेच त्या ठिकाणीया असलेल्या खेळाडूशी चर्चाही केली.