Alandi-Charholi road – आळंदी-चऱ्होली रस्त्याच्या कामाला सुरुवात
लोकवार्ता – आळंदी चऱ्होली रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गेली अनेक दिवस आळंदी-चऱ्होली रस्त्याचे काम 15 वित्त आयोग शासन निधी मार्फत चालू झाले आहे. हा रस्ता सिमेंटीकरणाचा होणार आहे.

याबाबत माहिती चऱ्होली ग्रापंचायतचे वरिष्ठ लिपिक रोहित थोरवे यांनी दिली आहे. मागील काही महिन्यांपासून होत असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर चिखलाच्या राडारोडामुळे तसेच जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे या रस्त्याची खूपच बिकट अवस्था निर्माण झाली होती.
त्यामुळे दुचाकीस्वारांना तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना या रस्त्यावरून चालण्यासाठी कसरत करावी लागत होती. या रस्त्यावरून चऱ्होली गावातून बऱ्याच विद्यार्थ्यांना आळंदीतील शाळेत ये जा करावे लागते. तसेच या गावचे बरेच नागरिकांना कामानिमित्त या रस्त्यावरून नेहमीच ये-जा करावी लागते. या रस्त्याचे नव्याने दुरुस्तीचे काम होत असल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.