“आल्हाट दाम्पत्याचे कार्य कौतुकास्पद -आमदार महेश लांडगे”
-मोशी येथे झालेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे यांनी उपस्थिती लावली
मोशी | लोकवार्ता –
कोरोना संकटात महिलांच्या मागे ठाम उभे राहणे, त्यांच्या हाताला काम, त्यांच्या व्यवसायाला व्यासपीठ मिळून देण्याचे कौतुकास्पद काम वंदनाताई हिरामण आल्हाट यांनी केले आहे. तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्याला अन्न देण्याची वृत्ती या आल्हाट दाम्पत्यात आहे आणि निश्चित समाजाचेदेखील अशा वृत्तीला आशीर्वाद लाभत असतात, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मोशी येथे हिरामण आल्हाट, वंदना आल्हाट यांच्यावतीने महिलांसाठी होम मिनिस्टर हा कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी आमदार लांडगे बोलत होते.

वंदना आल्हाट यांनी महिला बचत गटाबाबत केलेले कार्य उत्कृष्ट आहे. हिरामण आल्हाट यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. या सर्व गोष्टी समाजाच्या कौतुकास पात्र आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

या वेळी शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजाताई महेशदादा लांडगे, माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोषअण्णा लोंढे, माजी नगरसेविका शुभांगी लोंढे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, नगरसेवक लक्ष्मण सस्ते, सागर हिंगणे, संतोष बा. आल्हाट, कामगार नेते मारुती जांभुळकर, नगरसेविका अश्विनी जाधव, सुवर्णा बुर्डे, विनया तापकीर, माजी सरपंच तुकाराम आल्हाट, मंगल आल्हाट, उद्योजक निलेश नेवाळे, नंदूअप्पा आल्हाट, दत्तात्रय मोकाशी, ज्ञानेश्वर बा. आल्हाट, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तुकाराम कुदळे, हवेली बँकेचे संस्थापक कैलास आल्हाट, निलेश बोराटे, राहुल तळेकर, हनुमंत मामा धायरकर, राजेश सस्ते, राहुल रा. बनकर, योगेश तळेकर, गजेंद्र गायकवाड, स्वप्निल भोसले, राजेंद्र बोराटे, विक्रम वहिले, नितीन घिगे, रमेश वहिले, नाना सासवडे, तुषार सस्ते, संजय पा सस्ते, भानुदास आल्हाट, सचिन का. सस्ते, विकास सासवडे, शिवाजी आल्हाट, राजू गायकवाड, संजय कुदळे, राहुल सस्ते, गोरख हवालदार, गणेश कुदळे, माणिक आल्हाट, अनिकेत सस्ते, संदीप आल्हाट, रोहित आल्हाट आदी उपस्थित होते.