लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

चेअरमन नितीन लांडगे यांच्यासह चौघे अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळ्यात’

लाच प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठी कारवाई

लोकवार्ता । प्रतिनिधी

पिंपरी : ९ लाख रूपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पुण्याच्या लाचालुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली असून स्टैंडीग कमीटी चेअरमन -नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लांडगे यांच्यासह त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे.

पुणे ॲन्टी करप्शनचे अधीक्षक राजेश बनसोडे आणि अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या कारवाई सुरू असल्याचं सांगितलं आहे. मात्र, पुणे ॲन्टी करप्शनने ९ लाख रूपयांच्या लाच प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठी कारवाई केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. ९ लाखाचे लाच प्रकरण असल्याने आणि थेट मोठा मासा गळाला लागल्याने पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे. ॲन्टी करप्शनचे पथक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ठाण मांडून बसले आहे. कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे या लिपिकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. ९ लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. २ लाख रूपये पीए मार्फत स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्टँडींग कमीटीचे चेअरमन नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे, मनपा मधील लिपीक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती ॲन्टी करप्शनकडून देण्यात आली आहे.

स्टैंडीग कमीटी चेअरमन नितीन ज्ञानेश्वर लांडगे
PA – ज्ञानेश्वर पिंगळे
क्लार्क = अरविंद कांबळे
राजेंद्र शिंदे
मागणी – नऊ लाख
स्विकारले- दोन लाख ( PA)
टेंडर मंजुर झाले, वर्क ऑर्डर काढणे करीता

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani