लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

इंदापूरमधील सर्व अवैध कत्तलखाने अखेर भुईसपाट; पुन्हा शिवशंकर स्वामींच्या कार्याला आले यश

लोकवार्ता : गेल्या अनेक दिवसांपासून इंदुपूरात अवैध कत्तलखाने सुरु होते. पुन्हा पुन्हा विरोध करूनही हे कत्तलखाने भुईसपाट करण्यात येत नव्हते. अखेर गोरक्षक शिव शंकर स्वामींमुळे हे कत्तलखाने भुईसपाट करण्यात आले आहेत.

२०१९ पासून शिवशंकर स्वामी हे पुण्यश्लोक श्री मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी आणि सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांना भुईसपाट करण्यासाठी पाठपुरावा करत होते. या पावनभूमीत हजारो गोवंशाची कत्तल होत होती. पोलीस प्रशासनाच्या मदतीने असंख्य कारवाया झाल्या, कधी जिवंत गोवंश तर कधी गोमांस भेटत होते पण अवैध कत्तलखाने आहे तसेच होते, हा कलंक पुसण्यासाठी अखेर स्वामी यांनी न्यायालयीन पूर्तता करत वरिष्ठ अधिकारी व राज्यशासन यांच्याशी पत्रव्यवहार केला. इंदापूरसारख्या पुण्यभूमीचे पावित्र्य राखत 7 अवैध कत्तलखाने उध्वस्त करण्याचे उत्कृष्ट काम शिवशंकर स्वामी यांच्या पाठपुराव्यामुळे पोलिस प्रशासन व नगरपरिषदेने केले. त्याबद्दल इंदापूरातील जनतेने शिवशंकर स्वामींचे आभार मानले आहेत.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani