केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आमदार महेश लांडगे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट
लोकवार्ता : काही दिवसांपूर्वी आमदार महेशदादा लांडगे यांना मातृशोक झाला. हिराबाई किसनराव लांडगे (वय-६९) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांनतर त्यांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. आज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना.श्री नितीनजी गडकरी यांनी महेश लांडगे यांची भेट घेऊन सांत्वन केले.

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, आढळराव पाटील, सुनील आण्णा शेळके, चंद्रशेखर बावनकुळे, सदाभाऊ खोत, चित्राताई वाघ, श्रीरंग बारणे यांनी भेट दिली.
आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई लांडगे संधीवात आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जंतुसंसर्गामुळे प्रकृती चिंताजनक झाल्याने शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अनेक नेत्यांनी त्यांचे सांत्वन केले आणि लांडगे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले.