लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना ‘श्रावणबाळ पुरस्कार’ जाहीर

लोकवार्ता : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना ‘श्रावणबाळ पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ‘दावडी ते रामधाम’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निम्मिताने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

mahesh landage

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना ‘श्रावणबाळ पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ‘दावडी ते रामधाम’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निम्मिताने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

वडिलांप्रती अपार श्रद्धा असलेले भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्यासह त्यांच्या बंधुना यावर्षीचा ‘श्रवणबाळ पुरस्कार जाहीर झाला आहे. समाज जागृतीसाठी देण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण पुरस्काराचे यावर्षीचे मानकरी म्हणून आमदार महेश लांडगे आणि त्याचे दोन्ही बंधू सचिन लांडगे व कार्तिक लांडगे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

गुरूवारी सायंकाळी ५ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जागतिक आनंदाची शाळा व संस्मृती प्रकाशन तर्फे “दावडी ते रामधाम” हे पुस्तक आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. प्रकाशक विनय सातपुते यांनी त्यांचे वडील सैनिक रामभाऊ सातपुते यांचा चरित्रग्रंथ लिहला आहे. मुलांनी आपल्या आई वडीलांवर चरित्रग्रंथ लिहावा व त्यांची शेवट पर्यंत सुश्रुषा करावी हा विचार समाजापर्यंत पोहचविण्यासाठी पुस्तक प्रकाशना बरोबर ” श्रावणबाळ पुरस्कार” देणायत येणार आहे.

या कार्यक्रमात ह.भ.प. दिगंबर महाराज ढोकले यांचे प्रवचन आहे. तसेच समृद्ध कुटे याच्या बासरी वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे. त्याला तबल्याची साथ शांतनु देशमुख देणार आहेत, अशी माहिती विनय सातपुते यांनी दिली.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani