अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील महिला भाविकेचा मृत्यू
मृत महिला पुण्यातील धायरी येथील रहिवासी.
पुणे । लोकवार्ता
अमरनाथ यात्रेवर मोठं संकट आले असताना हि यात्रा तूर्तास रद्द करण्यात आली आहे.अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटीमध्ये अनेक भाविक अडकून पडले आहेत.यातच पुण्यातील दोन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.अमरनाथ यात्रेला पुण्यातून ५० भाविक गेले होते.यातील बाकीचे भाविक सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे.अमरनाथ यात्रेला गेलेल्या सुनीता भोसले रा.धायरी यांचा दरड कोसळून मृत्यू झाला आहे.

अमरनाथ यात्रेसाठी पुण्यातील आळंदी येथील गजानन महाराज सोनुने यांच्या बरोबर एका बसमधून ५० भाविक यात्रेसाठी गेले होते यामध्ये पुण्यातील धायरी येथील महेश राजाराम भोसले, सुनीता महेश भोसले हे पती-पत्नी आणि महेश भोसले याची बहीण प्रमिला प्रकाश शिंदे हे यात्रेसाठी गेले होते. शुक्रवारी सायकाळी सहाच्या सुमारास त्याचे दर्शन झाले. दरम्यान अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याने त्यात दरड कोसळून सुनिता भोसले यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला असून महेश जोसले व प्रमिला शिंदे या दुर्घटनेतून बचावले आहेत.