लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

प्रभागांतर्गत बदलीसाठी आयुक्तांची सकारात्मक भूमिका; आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

लोकवार्ता : पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ६८ कर्मचाऱ्यांची बदली एका क्षेत्रीय कार्यालयातून दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून, प्रशासनाने प्रभागांतर्गत बदली करण्याबाबत सकारात्मक विचार करावा अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत.

आरोग्य विभागात काम करणाऱ्या ६८ कर्मचाऱ्यांची प्रशासनाने अन्य क्षेत्रीय कार्यालयामध्ये बदली केली. यामध्ये आरोग्य मुकादम आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांचा बदलीला विरोध नाही. मात्र, प्रभागांतर्गत बदली व्हावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी संघाच्या प्रतिनिधींनी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली.

अन्य क्षेत्रीय कार्यालयात बदली केल्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काही कामगारांची सेवानिवृत्ती जवळ आली आहे. वयोमानानुसार काहीजणांना अन्य ठिकाणी कर्तव्य बजावण्यात आव्हानात्मक होत आहे. काही अंशत: अपंग कर्मचारी आहेत. निवासाजवळ काम असल्यामुळे वेळेवर कामावर येणे शक्य होणार आहे. त्यामुळे बदलीला विरोध नाही. मात्र, आहे त्याच प्रभागामध्ये बदली व्हावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान, आमदार लांडगे यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्याशी तात्काळ फोनवर संपर्क साधला आणि कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत चर्चा केली. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे संबंधित ६८ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष अभिमान भोसले, लाला गाडे, दिलीप गुंजाळ, नितीन समगीर, श्री. विटकर आदी प्रतिनिधींनी आमदार लांडगे यांना मागणीचे निवेदन दिले.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani