सेवाभावी वृत्तीने काम करणे हेच भाजपाचे संस्कार !
लोकवार्ता : देशातील शेवटच्या घटकाचा विकास आणि सेवाभावी वृत्ती हा भाजपाचा विचार आहे. त्यामुळे आज आदिवासी समाजातील पहिली महिला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांना संधी मिळाली. देशातील वंचित, दुर्लक्षित समाजासाठी हिताचे कार्य करण्यात भाजपाचे महत्वपूर्ण योगदान आहे. देशातील सर्वसामान्य व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहचू शकते, असा विश्वास भाजपने देशवासीयांच्या मनात निर्माण केला आहे अशा भावना भाजपा शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

देशाच्या राष्ट्रपतिपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील आदिवासी शाळांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी येथील विद्यार्थ्यांना शाळेसाठी आवश्यक वस्तूंचा आणि दैनंदिन वापरातील वस्तू भेट म्ह्णून देण्यात आल्या. एकूण आठ शाळांमध्ये संगणक, खुर्च्या, टेबल, ग्रंथालयातील साहित्य, छत्री, रेनकोटकिराणा असे सुमारे २० लाखांचे साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
याप्रसंगी आमदार महेश लांडगे म्हणाले की, समर्पण आणि सेवाभाव हाच भाजपचा संस्कार आहे. ‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ आहे. आणि याच भावनेतून आम्ही आदिवासी शाळांना शालेयपयोगी साहित्य आणि जीवनावश्यक वस्तू भेट म्ह्णून दिले आहेत. २२ जुलै आणि २३ जुलै या दोन दिवसात स्वतः उपस्थित राहून सुमारे २ हजार ३०० विद्यार्थ्यांना थेट मदत करता आली याच मला समाधान वाटत, असं देखील यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, विनायक थौरात, जनजाती सुरक्षा मंचचे एंड, किरण गभाले, अशोक गभाले, निलेश साबळे, दिलीप देशपांडे, अमोल डमरे, सुरेश कौदरे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वनवासी कल्याण आदी मान्यवर उपस्थित होते.