मोदी सरकाराच्या काळात ३५ हजार उद्योजक हे देश सोडून गेले,
पं. बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांची टीका-
“काल्पनिक भितीमुळे उद्योजक देशाबाहेर गेले, याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मित्रा यांची मागणी”
पंतप्रधान मोदी यांच्या २०१४ ते २०२० या काळात उच्च क्षमतेचे – उच्च मुल्य असलेले ३५ हजार पेक्षा जास्त उद्योजक हे देशाबाहेर गेले असल्याचा आरोप पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी केला आहे. हे सर्व भयगंडातून. काल्पनिक भितीमुळे झालं असावं, एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योजक देशाबाहेर का गेले याबाबत मोदी सरकारने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी अर्थमंत्री मित्रा यांनी केली आहे.
२०१४ ते २०१८ या काळात २३ हजार, २०१९ मध्ये ७ हजार आणि २०२० मध्ये ५ हजार उद्योजक हे देशाबाहेर गेले असल्याचा दावा अमित मित्रा यांनी केला आहे. देशाबाहेर जाणारे उद्योजक हे अनिवासी भारतीय होते. अशा प्रकारचे हे जगातील सर्वात मोठे निर्वासन आहे, यामुळे देशाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोपही मित्रा यांनी केला आहे.
https://lokvarta.in/wp-admin/post.php?post=10949&action