लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

अमोल कोल्हे एकांतवासात !बेभान होऊन घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार ?

राजकीय चर्चांना जोरदार उधाण.

पिंपरी।लोकवार्ता-

राष्ट्रवादी काँग्रेस चे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट करत एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. हे सांगताना त्यांनी गेल्या वर्षभरात बेभान होऊन केलेल्या कामांची , काही टोकाचे निर्णय घेतल्याची आणि अनपेक्षित पावलंही उचलल्याचं कबूल केलं. त्यामुळे त्यांच्या या एकांतवासात जाण्याच्या निर्णयावरून राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलंय.

अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये म्हणाले, “सिंहावलोकनाची वेळ. गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलंही उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल, पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं-
थोडं मनन, थोडं चिंतन!”घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू. नव्या जोमाने, नव्या जोशाने!” अशी माहिती त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून दिली.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani