मोशी मध्ये मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
-नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तर पालिकेच दुर्लक्ष.
मोशी| लोकवार्ता-
मोशी परिसरात सध्या मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत चालला आहे.पालकांसमोर मोठे आव्हान आहे.मोशी परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताकडे पिंपरी चिंचवड पालिकेचे दुर्लक्ष होत असून यामुळे कुत्र्यांच्या उपद्रवामुळे येथील नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड होत आहे. मोशी सेकटर चार,सहा येथे व स्पाईन रस्ता परिसरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.त्यांचा उपद्रव वाढला असल्याने त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

स्पाईन रस्त्यावर भरधाव येणारया वाहनाला मोकाट कुत्री आडवी जातात यामुळे अफघात घडून येतो.अशीच काहीशी स्थिती अंतर्गत रस्त्यावरती देखील आहे.रात्रीच्या वेळी फिरण्यास बाहेर पडणारया नागरिकांना या मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागतो.त्यांच्या हल्ल्या मध्ये नागरिक किरकोळ जखमी झाल्याच्याही घटना घडत आहेत.प्राधिकरण सर्कल भागात कुत्र्यांचा उपद्रव अधिक आहे. यामुळे संबधीत प्रशासनाने सदर परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक रहिवाशी व नागरिकांच्या वतीने होत आहे.