गरिबांचे संसार रस्त्यावर ! राष्ट्रवादीचे इच्छुक नेते ‘नॉट रिचेबल’, नागरिकांनी व्यक्त केला संताप
लोकवार्ता : गेल्या आठवडाभरात महापालिकेकडून अनधिकृत पत्राशेड आणि टपऱ्यांवर धडक कारवाई होत असल्यानं अनेक गोर गरिबांचे संसार आता रस्त्यावर आले आहेत. अशावेळी स्थानिक राष्ट्रवादीचे नेते नॉट रिचेबल असल्यानं आता नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

लोकवार्ता : गेल्या आठवडाभरात महापालिकेकडून अनधिकृत पत्राशेड आणि टपऱ्यांवर धडक कारवाई होत असल्यानं अनेक गोर गरिबांचे संसार आता रस्त्यावर आले आहेत. अशावेळी स्थानिक राष्ट्रवादीचे नेते नॉट रिचेबल असल्यानं आता नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
न्यायालायने आदेश दिल्यांनतर महापालिकेने अनधिकृत पत्राशेडवर कारवाई मोहीम हाती घेतली आहे. यात सर्वसामान्य गरीब लोक बळी पडलेले आहेत. या कारवाईला विरोध करत महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना कारवाई थांबवण्याची मागणी केली होती. मोशी परिसरातील पुणे- नाशिक महामार्गावरील अनधिकृत पत्राशेडवर कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांनी भूमिका घेतली होती.
वास्तविक पाहता राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. सद्याचे आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती महाविकास आघाडीच्या काळात झाली. अशावेळी राजेश पाटील हे भाजपा बंदोबस्त करण्यासाठीच आणले आहेत, असा संदेश आता तळागाळात पोहचला आहे. राज्यातील सत्तेच्या मदतीने आयुक्तांवर दबाव आणून अनधिकृत टपऱ्या आणि पत्राशेवरील कारवाई रोखता येईल, असा स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अंदाज होता. परंतु पत्राशेड आणि टपऱ्यांवर अवलंबून असलेल्या आणि नोटीस मिळालेले नागरिक राष्ट्रवादी, शिवसेनेच्या संबंधित नेत्यांकडे आणि त्या-त्या प्रभागातील इच्छुकांकडे चकरा मारू लागले. आयुक्त कारवाई थांबवतील आणि आपल्याला यश मिळेल या नादात लोकांना आश्वासने देण्याचं काम करण्यात आलं. मात्र आयुक्तांना थांबवणे शक्य नसल्याचं कळताच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आता ‘नॉट रिचेबल’ आहेत. लोकांना काय उत्तर देणार? म्हणून आता हे नेते गायब झाले आहेत. त्यामुळे नारीकांमध्ये संताप वाढला आहे.