आनंद हरपला…! अन् बैलांन प्राण सोडला… सगळा गाव ढसाढसा रडला…
लोकवार्ता : आज सकाळ पासून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका बैलाचं निधन झालं आणि सगळा गाव ढसाढसा रडू लागला.
हि घटना आहे पुण्यातील पिंपळे सौदागर मधली. कै. देवराम शेठ यशवंतराव पाटील यांच्या लाडक्या बैलांन पुण्याचं नाव गाजवलं असा बनश्या बैलाचं निधन झाल्यानं संपूर्ण परिसरात शांतता पसरली. बनश्या ग्रुप, पिंपळे सौदागर च्या सर्व बैलप्रेमींनी या बैलावर अंतिमसंस्कार केले.
अनेक वर्षांपासून पाटील कुटुंबाला या बैलांन सांभाळलं. प्राणी देखील बैलांना एवढा जीव लावतात की ते सोडून गेल्यावर एक पोकळी निर्माण होते. आज या घटनेतून हे दिसून आलं आहे.