स्वखर्चातून गुन्हेगारांना चांगल्या वळणावर नेणारा देवदूत – डॉ. विजय मोरे.
लोकवार्ता :
आजकाल १५ ते १८ वर्ष वयोगट असणाऱ्या मुलांमध्ये बाल गुन्हेगारी चे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर, रील, भाईगिरी करण्याच्या नादात आजकाल मुलं गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. यातून व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. बाल गुन्हेगार हा एखाद्या गोष्टीच्या आहारी जाऊन त्याच्या कडून गुन्हे घडतात. तसेच काही वेळेस त्यांचा कडून गुन्हे करून घेतले जातात. यातून बाल वयात मुलांचा कल व्यसनाकडे वळतो. अशावेळी या मुलांना व्यसनातून, गुन्हेगारीतून बाहेर काढून त्यांच्या पुनर्वसनाच काम गेली २२ ते २५ वर्ष डॉ. विजय मोरे करत आहेत.
हॉप फाउंडेशन, भूमिका फाउंडेशन, सहारा organization, आस्था organization अशा संस्थांमार्फत समाजात वाढत चाललेली बाल गुन्हेगारी थांबवण्यासाठी आणि व्यसनमुक्ती करण्यासाठी या संस्था कार्य करतात. हे काम फक्त पुण्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्र्र, गोवा, कर्नाटक या राज्यातून पेशंट येतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून बाल गुन्हेगारीचे आणि व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा मुलांना या परिस्थितीतून बाहेर काढून त्यांना नोकरी, व्यवसाय देऊन एक सुजाण नागरिक घडवण्याचे काम विजय मोरे गेली कित्त्येक वर्ष करत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड सह संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. बाल गुन्हेगारी मुळापासून नष्ट करण्यासाठी ही संस्था सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. हे काम फक्त पुण्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्र्र, गोवा, कर्नाटक या राज्यातून पेशंट येथे येतात.
आर्थिक व्यवस्था ढासळली की ती व्यक्ती गुन्हेगारी कडे वळते. त्यामुळे अशा व्यक्तींना जर उद्योग, व्यवसाय उभा करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम विजय मोरे करत आहेत. यातून नक्कीच काही प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसला आहे. आज विजय मोरे यांनी अनेक गुन्हेगारांना चांगले काम देऊन या परिस्थितीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार पुन्हा नव्याने उभे करण्यात डॉक्टर विजय मोरे यांची मोठी भूमिका आहे.