पोलीस अधिकाऱ्यांबाबत गृहमंत्र्यांचा खळबळजनकआरोप,वरिष्ठअधिकाऱ्यांनी केला होता ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न;

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केला होता, पण तो वेळीच हाणून पाडला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दल गंभीर आरोप केला आहे.
‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी हा आरोप केला आहे. काही अधिकारी हे चांगले काम करत आहेत. पण काही पोलीस खात्यात काही अधिकारी असेही आहे जे इतर राजकीय नेत्यांशी जवळीक साधून आहेत. त्यांची नावे घेता येणार नाही, असे आरोप करत गृहमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या या खुलाशानंतर तर आणखी प्रश्न उपस्थित होत आहेत. गृहमंत्री जर मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी या बदल्या केल्याचं म्हणत असतील तर पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना न विचारताच या बदल्या केल्या का? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्याला गृहमंत्र्यांची परवानगी लागते. पोलिसांच्या बदल्यांचे आदेशाचं परिपत्रक बघितलं तर ते मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाने नाही, तर गृहविभागाने म्हणजेच अनिल देशमुखांच्या खात्याने काढलं आहे. मग गृहमंत्री या बदल्या मुंबई पोलीस आयुक्तांनी केल्या आहेत, हे कोणत्या आधारावर म्हणतात? तसंच पोलीस आयुक्तांना अशा बदल्यांचे अधिकार नाहीत.
एवढेच नाहीतर, शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेतले. त्यानंतर तातडीने पदावरून बाजूला करण्यात आले. त्याच बरोबर चार अधिकाऱ्यांची नावही सांगितली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने पावलं उचलत काही अधिकाऱ्यांना बाजूला सारले. तर काही अधिकारी अजूनही पदावर कायम आहेत. अशा अधिकाऱ्यांना तातडीने बाजूला हटवायला पाहिजे होते, अशी मागणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने केली होती.
मार्च महिन्यात लॉकडाउन लागू झाला. त्यानंतर अमिताभ गुप्ता या पोलीस अधिकाऱ्यांनी येस बँक घोटाळ्यातील आरोपी उद्योगपती कपिल वाधवान यांच्यासह 22 जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी पत्र दिले होते. या पत्रामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले होते. नुकतीच अमिताभ गुप्ता यांची बदली करण्यात आली असून पुण्याचे आयुक्त म्हणून नियुक्त केले आहे.
अमिताभ गुप्ता यांच्याकडून मोठी चूक झाली होती. त्यांनी खुद्द चौकशी समितीकडे याची कबुली दिली. पण त्यांची कारकीर्द चांगली असल्यामुळे त्यांना पुण्याचा पदभार दिला, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
भाजपचे नेते वारंवार राजभवनावर जावून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत असतात. कोणत्याही मुद्यावर देवेंद्र फडणवीस हे राजभवनाकडे धाव घेतात. त्यापेक्षा फडणवीस यांनी राजभवनावर खोली घेऊन राहावे, म्हणजे जाण्या-येण्याचा त्रास कमी होईल, असा टोलाही देशमुख यांनी लगवल्