गायत्री स्कूलचा वार्षिक क्रीडा दिन संपन्न
लोकवार्ता : स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक क्रीडा दिन काल (दि. .२४) रोजी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर, भोसरी येथे मोठया उत्साहात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मॅरेथॉन, खोखो, कबड्डी, फन रेस यासोबतच झुंबा डान्स, पिरॅमीड, डम्बेल डान्स यांचाही समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे याेगेश एंटरप्रायझेसचे व्यवस्थापकिय संचालक श्री.याेगेश भाेंगाळे हस्ते मशाल व दिप प्रज्वलनाने झाली.
शालेय व दैनंदिन जीवनात खेळ व व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व मा.श्री.विनायक भाेंगाळे यांनी सांगितले. संचालिका सौ. कविता कडू पाटील,विश्वस्त सौ. सरिता विखे पाटील,मुख्याध्यापक श्री. शशिकांत जोडवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
विद्यालयातील शिक्षक, विदयार्थी, पालक, पालक शिक्षक संघाचे प्रतीनिधी यांच्या समवेत अतिशय आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात क्रीडा दिन संपन्न झाला. मा.अध्यक्ष श्री.विनायक भाेंगाळे, सचीव श्री. संजय भाेंगाळे यांनी विद्यालयाच्या समन्वयक साै.राेहीनी पाटील, क्रिडा शिक्षक श्री. रविंद्र कलवई व श्री. सुरेश खरात व सर्व शिक्षकवृंदाचे कार्यक्रमाच्या यशाबद्दल अभिनंदन केले. तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन साै.श्रद्धा गुरव यांनी केले.