महापालिकेतील पुन्हा दोन अधिकाऱ्यांच्या कामकाजात अदलाबदल
लोकवार्ता : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विनोद जळक यांच्याकडील क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार काढून फक्त स्वच्छ सर्वेक्षणाचे कामकाज कायम ठेवले. तर, प्रशासन अधिकारी शीतल वाकडे यांच्याकडील कर संकलन विभागाचा पदभार काढून ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचा नव्याने पदभार देण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात राजेश पाटील यांची बदली झाल्याने शेखर सिंह यांनी महापालिका आयुक्त आणि प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतला. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या कामकाजात बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, सध्या आयुक्त आढावा घेत आहेत. त्यामुळे आताच सर्व विभागप्रमुख बदलले जाणार नसल्याची शक्यता आहे.