आवाहन ! पवना धरणाच्या पाणी पातळीत वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
लोकवार्ता : गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पवना धरण परिसरात जोरदार पाऊस कोसळत असून, धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने मोठी वाढ होत आहे. धरण शंभर टक्के भरले असून धरणातून पाण्याचा विसर्गही सातत्याने वाढवला आहे.

आज सकाळी आठ वाजता पाण्याचा 5600 क्युसेक विसर्ग करण्यात येत होता. मात्र, सातत्याने पाऊस वाढत असल्यामुळे दुपारी एकपासून 6400 क्युसेस व पावर आऊटलेट 1400 असे एकूण 7800 क्युसेक वाढविण्यात येणार आहे.
तसेच, गेल्या तीन दिवसांपासून पर्जन्यमान वाढले आहे. त्यामुळे पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होवू लागली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिक व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.