बिल्डर विरुद्ध सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारी निवारण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करा
-चिखली-मोशी हौसिंग सोसायटी फेडरेशन ची मागणी.
पिंपरी । लोकवार्ता
मुंबई पोलीस आयुक्तांच्या प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये बिल्डर विरुद्ध सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या (सोसायट्यांच्या) विविध तक्रारी निवारण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करून पोलीस निरीक्षक दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून त्यावर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी चिखली-मोशी हौसिंग सोसायटी फेडरेशन नि आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे केली आहे.पिंपरी चिंचवड शहरात सहा हजारा ( 6000) पेक्षा जास्त सहकारी गृहनिर्माण संस्था( सोसायट्या )आहेत .आणि त्यामधील कित्येक गृहनिर्माण प्रकल्पामध्ये बिल्डरांनी नियमबाह्य काम केलेली आहेत.

या बिल्डर विरुद्ध सोसायट्यामधील सदस्य, मॅनेजमेंट कमिटी मोफा कायद्यानुसार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेल्यावर आपल्या पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून टाळा टाळ केली जाते, तक्रार नोंदवून घेतली जात नाही. तसेच बऱ्याच वेळा हे बिल्डर सोसायट्यांमधील सदस्यांना धमक्या देतातना व धाकदपटशाही करताना आढळून येतात.या प्रकरणाने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मण झाले आहे. सर्व सोसायटी धारकांना कायद्याप्रमाणे न्याय मिळण्यासाठी मुंबई शहराच्या धर्तीवर आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील देखील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सोसायटी धारकांच्या बिल्डर विरुद्ध विविध तक्रारी नोंदवून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी एक स्वतंत्र विभाग करावा व त्यासाठी एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी असे फेडरेशन चे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.