चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी ‘संतोष कलाटे’ यांची नियुक्ती
पिंपरी।लोकवार्ता-
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कलाटे यांना नियुक्तीचे पत्र दिले. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, नगरसेवक विलास मडिगेरी यावेळी उपस्थित होते..
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्य पदी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी वाकड येथील संतोष कलाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चाकड भागातील सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात संतोष कलाटे यांचा पुढाकार असतो.गेल्या काही काळात केलेले सामाजिक काम, राजकीय क्षेत्रातील कार्य, अनुभव उल्लेखनीय आहे. अनुभव लक्षात घेऊन कलाटे यांची चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे.
आगामी काळात आपण आपल्या सहका-यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम करावे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे.