लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासक पदी आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती

-अखेर महापालिकेवर 13 मार्चपासून प्रशासक.

पिंपरी । लोकवार्ता-

महापालिका प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी काढला आहे. आदेशात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने माहे मार्च-एप्रिल 2022 मध्ये मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका विहीत वेळेत घेणे शक्य होणार नसल्याचे तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 243 U तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 6. 6(अ) मधील तरतुदीनुसार महापालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत-जास्त पाच वर्षांची असल्यामुळे ही मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी व विशेषतः कलम 452 अ च्या (1अ) व (1ब) मधील तरतुदीनुसार 13 मार्च 2022 रोजी मुदत संपत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासक पदी आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयुक्त पाटील यांनी महानगरपालिकेची विहीत मुदत संपताच प्रशासक म्हणून कार्यभार स्विकारावा तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करावी असे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आदेशात म्हटले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे महापालिका निवडणूक वेळेत झाली नाही. निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे 13 मार्चनंतर महापालिकेवर प्रशासक राजवट असणार आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani