पुणे महापालिका क्षेत्रीय कार्यालयात समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक
-नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन समन्वयक अधिकारी नेमण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला.
पुणे । लोकवार्ता-
पुणे महापालिका प्रशासनाच्या ताब्यात आल्यापासून प्रशासनाने या अनधिकृत फलकबाजीवरही महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील अतिक्रमणावर कारवाई करत असताना दुसरीकडे महापालिकेच्या संदर्भात दाखले, पैसे भरण्याच्या सुविधांसह दिल्या जात आहे. या सुविधा देण्यासाठी व तक्रारींच्या निवारणासाठी महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालये सुरु करण्यात आली आहेत. आता या नागरी सुविधा केंद्राच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी . आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक समन्वयक अधिकारी नेमला जाणार आहे.यामुळे नागरी सुविधा केंद्रांमधील गैरसोयी दूर होत नागरिकांना सहजरित्या मदत मिळणार आहे.

पुणे महापालिकेकडून एकूण 15 विविध विभागांतील सुविधा या सुविधा केंद्रातून दिल्या जातात. महापालिकेचा कार्यकाळ संपल्यापासून नागरिकांना उडवाउडवीची उत्तर दिली जात होती. याबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन समन्वयक अधिकारी नेमण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. या अधिकाऱ्यांमुळे महापालिकेला प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयावर नजर ठेवणे शक्य होणार आहे. हा अधिकारी या 15 विभागांशी समन्वय ठेवणार असून नागरिकांना येणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष जागेवर सोडविल्या जाणार आहेत. याबरोबरच नागरिकांसाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर तक्रार पेटीही ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना थेट तक्रार करणे सोप्पे होणार आहे.