लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

अतिरिक्त आयुक्त पदी प्रदीप जांभळे-पाटील यांची नियुक्ती

लोकवार्ता : पिंपरी-चिंचवड महापालिकेत काही दिवसांपासून सुरु असलेल्या कथानाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी काल (शुक्रवारी) दुपारी महापालिकेत दाखल होत तातडीने पदभार स्वीकारला.

अतिरिक्त आयुक्त

भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील (IRPFS) विकास ढाकणे यांची 13 सप्टेंबर रोजी राज्य शासनाने महापालिका अतिरिक्त आयुक्तपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली होती. त्यांच्याजागी महापालिकेतच सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलेल्या आणि आता उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली होती. पण, नियुक्तीचा आदेश येवूनही झगडे यांना नऊ दिवस अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार आयुक्तांनी दिला नव्हता. गुरुवारी सायंकाळी झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती रद्द झाल्याचा शासन आदेश आला. त्यांच्याजागी वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली.

गुरुवारी नियुक्तीहोताच जांभळे-पाटील आज शुक्रवारी तातडीने दुपारी महापालिकेत दाखल झाले. रूजू अहवाल आयुक्तांकडे पाठविला आणि आयुक्तांनी अहवालावर स्वाक्षरी केली. त्यानंतर जांभळे-पाटील यांनी दालनात जाऊन अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani राष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022 महाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन ? | children day 2022 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj