लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

६ तारखेला चिंचवड येथे भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन

लोकवार्ता : चिंचवड विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या उमेदवार अश्‍विनी लक्ष्मण जगताप यांचा सोमवारी (दि. 6) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे.

चिंचवड

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पिंपळेगुरव ते थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली जाणार आहे. ही पदयात्रा लक्षवेधी ठरावी. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती चिंचवड विधानसभेचे निवडणूक व प्रचारप्रमुख शंकर जगताप यांनी दिली. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि राज्यातील नेत्यांनी दोन दिवसांपासून विविध पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्यासह पक्षाचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani