चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून वाकड मधील सोसायट्यांचे बोअरवेलचे काम पूर्ण
लक्ष्मण जगताप आणि रामभाऊ वाकडकर यांच्या प्रयत्नातून काम यशस्वीरित्या पूर्ण.
पिंपरी।लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड शहराचे भाजप उपाध्यक्ष रामभाऊ वाकडकर आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून बोअरवेल चे काम निर्विघ्न पार पडले आहे. वाकड परिसरातील सोसायट्यांमध्ये हि कामे करण्यात आली.
झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्येमुळे वाकड परिसरात पाण्याची समस्या कायम उद्भवत होती. मात्र लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून हि समस्या दूर झालेली आहे अशी माहिती भाजप उपाध्यक्ष रामभाऊ वाकडकर यांनी दिली.

लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून वेस्टर्न एव्हीनिव ,अँटलांटा १,अँटलांटा २,वेदांत या सोसायट्यांमध्ये बोअरवेल चे काम पूर्ण झाले असून उर्वरित सोसायट्यांचे कामे लवकरच पूर्ण होतील अशी माहिती त्यांनी दिली.