जवाहर मनोहर ढोरे यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून अटल प्रभाग आरोग्यालय ही मोफत बाह्य रुग्ण तपासणी
शंकरशेठ जगताप यांच्या शुभहस्ते या उपक्रमाचे उद्घाटन

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी : कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पाश्र्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. त्यातच आरोग्य सेवा महाग झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दवाखान्यातील उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

हीच बाब लक्षात घेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून जवाहर मनोहर ढोरे यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून अटल प्रभाग आरोग्यालय ही मोफत बाह्य रुग्ण तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या ठिकाणी मोफत औषधोपचार, मोठ्या आजारावर मोफत शस्त्रकिया असे करण्यात येईल मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या शुभहस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर सौ.माई ढोरे, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, स्थायी समिती सदस्य संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, सतिष कांबळे सर प्रभाग ३२ अध्यक्ष कृष्णा भंडलकर, महिला अध्यक्षा प्रभाग ३२ दर्शना कुभांरकर, संतोष ढोरे,दिलीप तनपुरे,आप्पा ठाकर,श्री.शेळके,श्री.भोसले,श्री.कमलाकर जाधव,श्री.शिवलिंग किंणगे,श्री.धनंजय ढोरे,श्री.दत्ता यणपूरे,श्री.भुषण शिंदे,श्री.महेश भागवत,श्री.गणेश काची,श्री.सुरज चव्हाण,आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार उपस्थित होते.