लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

चक्क बैलगाडा पाहण्यासाठी विदेशी पर्यटकांची हजेरी

-सर्व बैलगाडा प्रेमींकडून विदेशी पर्यटकांचं स्वागत.

चिखली । लोकवार्ता
पिंपरी – भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आता लोकल टू ग्लोबल असा प्रवास करताना दिसत आहे. महाराष्ट्राचा हा रांगडा खेळ पाहण्यासाठी विदेशी प्रेक्षकांनी हजेरी लावली. नेदरलँडमधील प्रेक्षकांनी घाटात उपस्थित राहून बैलागाडा शर्यतींचा थरार अनुभवला. तसेच शर्यतीच्या दुसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी 15 हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली.

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आणि माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्या नियोजनातून भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर सुरू आहे. या शर्यतींचे संयोजन जय हनुमान बैलगाडा मंडळ, राहुलदादा जाधव बैलगाडा मंडळाने केले आहे.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवार असल्यामुळे बैलगाडा शौकींनांसह सर्वसामान्य नागरिकांनी रामायण मैदानावर मोठी गर्दी केली होती. चाकण औद्योगिक पट्टयातील जीकेएन एरोस्पेस कंपनीचे संचालक असलेले विदेशी नागरिक बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहिले. मार्टिन दुर्विले, जोस्ट दुर्विले आणि युस्ट कम्पहुइस अशी तिघांची नावे आहेत. भारतीय संस्कृतीप्रमाणे महाराष्ट्रीय फेटा बांधून स्वागत करण्यात आहे. पाहुण्यांना अगदी वाजत-गाजत घाटात आणण्यात आले.

पाहुण्यांना अगदी वाजत-गाजत घाटात आणण्यात आले. उपस्थित श्रोत्यांनी जल्लोष करीत विदेशी पाहुण्यांचे स्वागत केले, अशी माहिती जय हनुमान बैलगाडा मंडळ व उत्सव समितीचे अध्यक्ष हनुमंत जाधव यांनी दिली.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani