लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

चिखली येथील बैलगाडा शर्यतीला सदाभाऊ खोत यांची उपस्थिती

-सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादीवर टीका;बैलगाडा बंदीच्या मुद्द्यावरून साधला निशाणा.

चिखली । लोकवार्ता
चिखली येथील सुरु असलेली भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीला सदाभाऊ खोत यांनी उपस्थिती लावली.यावेळी सदाभाऊ खोत यांचं जंगी स्वागत याठिकाणी करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना बैलगाडा बंदीवरील झालेल्या घटनांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस वर निशाणा साधला. शेजारच्या घरी पाळणा हलायला लागला की राष्ट्रवादीवाले पेढे वाटतात असा टोला रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. सदाभाऊ खोत यांनी पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या बैलगाडा शर्यतीला हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी बैलगाडा शर्यतीच्या श्रेय वादावरून राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेच बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती असा हल्लाबोल देखील सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

राष्ट्रवादी पक्ष असा आहे की, शेजारच्या घरी पाळणा हलायला लागला की ते पेढे वाटायला लागतात.. राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ साली बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणली. त्यावरील बंदी उठवण्याचा पहिला अध्यादेश माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काढला. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी विधयक आणलं होतं. बेलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत निर्णय घेतला. उच्च न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू देवेंद्र फडणवीस, आमदार महेश लांडगे यांनी मांडली. त्यांनी नेमलेल्या समितीचा रिपोर्ट ग्राह्य धरला आणि बेलगाडा शर्यतीवरील बंदी उठले, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani