देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत होणार जाधववाडीत
लोकवार्ता : देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत जाधववाडी येथे होणार आहे. येत्या २८ ते ३१ मे या चार दिवसांच्या कालावधीत या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि त्यांचे कट्टर समर्थक नितीन, राहुल जाधव यांच्या सहकार्याने या शर्यतींचे आयोजन करण्यात आल्याने बैलगाडा प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत जाधववाडी येथे होणार आहे. येत्या २८ ते ३१ मे या चार दिवसांच्या कालावधीत या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि त्यांचे कट्टर समर्थक नितीन, राहुल जाधव यांच्या सहकार्याने या शर्यतींचे आयोजन करण्यात आल्याने बैलगाडा प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
येत्या दिवसात होणारी ही शर्यत भारतातील सर्वात मोठी शर्यत असल्यानं गाडा प्रेमींच्या उत्साहात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंद उठवली आहे. त्यानंतर मावळ तालुक्यात पहिली बैलगाडा शर्यत आमदार सुनील शेळके यांनी भारवली होती. त्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथे दुसरी शर्यत भरवली. आता भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून भव्य बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जात आहेत.
दिनांक २८ मी रोजी केंद्रीय पर्यावरण आणि वन्य राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शुभहस्ते सकाळी सात वाजता शर्यतींचे उदघाटन होणार आहे. ३१ मे रोजी सकाळी सात वाजता शर्यतींचा बक्षीस वितरण समारंभ होईल.
या शर्यतीत तीन चारचाकी, १०३ दुचाकी, २२ तोळे सोने, दहा चांदीच्या गाडा यासह लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या बैलगाडा मालकाला १५ लाख रुपये आणि एक बोलेरो देण्यात येणार आहे. या शर्यतींसाठी देशातील विविध भागातून बैलगाडा प्रेमी येणार आहेत.