लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

सावधान ! पिंपरी मध्ये आढळले ओमायक्रॉन चे सहा रुग्ण!

पिंपरी | लोकवार्ता-

आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. डोंबिवलीनंतर आता पुण्यात एकूण ओमायक्रॉनचे तब्बल 7 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या ही एकूण 8 इतकी झाली आहे. आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. या 7 पैकी 6 जण हे पिंपरी चिंचवडमधील आहे. तर उर्वरित 1 जण पुण्यातील आहे. या 7 जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे या 7 जणांपैकी 3 जणांनी कोरोना लस घेतलेली नाही.  

मिळालेल्या माहितीनुसार सहापैकी 3 जण नायजेरियामधून आल्याची माहिती मिळाली आहे. तर इतर 3 जण त्यांच्या जवळचे असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी 13 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 45 वर्षांचा भाऊ, दीड वर्षे आणि 7 वर्षांच्या दोन मुलींना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे.

नायजेरीयावरून आलेल्या महिलेची लक्षणं अत्यंत सौम्य असून इतर 5 जणांना कोणतीही लक्षण नाही. मात्र त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 6 पैकी 3 जण 18  वर्षांखालील असल्याने त्यांनी लस घेतली नाही. तर उर्वरित 3 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

पिंपरी चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आल्याने आता चिंता वाढली आहे. त्यामुळे आता पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. 

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani