लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पहिल्यांदाच सरपंच झाला, मित्रांनी दिली फॉर्च्युनर कार गिफ्ट

लोकवार्ता : महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडलेल्या या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, या प्रमुख पक्षांसह एकाच पक्षाची 2 शकलं झालेल्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. तर काही पहिल्याच झटक्यात विजयी होऊन थेट सरपंच झाले. पहिल्याच झटक्यात सरपंच झाल्याने मित्राने महागडी फॉर्चुनर कारच गिफ्ट दिली आहे.

दत्तात्रय हरगुडे असं या फॉर्चुनर कार गिफ्ट मिळालेल्या नवनिर्वाचित सरपंचाचं नाव आहे. दत्तात्रय पुण्यातून केसनंद ग्रामपंचायतीतून पहिल्याच झटक्यात सरपंच म्हणून निवडून आला. आपला मित्र पहिल्याच झटक्यात सरपंच म्हणून निवडून आल्याची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. मित्रांनी एकच जल्लोष केला.

आता मित्र सरपंच झाल्यावर जल्लोष तर होणारच. साधारणपणे मित्रासोबत काही चांगलं झालं की त्याच्याकडून पार्टी घेण्याची पद्धत असते. मात्र दत्तात्रयच्या मित्र परिवाराने उलट केलं. दत्तात्रयला थेट फॉर्चुनरसारखी स्टेटस सिम्बॉल असणारी कार गिफ्ट म्हणून दिली. तर मित्रांनी फॉर्चुनर कार दिल्याने दत्तात्रय भारावून गेला.

“सरपंचपदी निवड झाल्याने मला फॉचुनर कार मला गिफ्ट दिली यासाठी सर्व मित्रांचे आभार मानतो. या भेटीचा मी गावाच्या विकासासाठी 100 टक्के प्रयत्न करेन. मित्रांचं माझ्यावर असंच प्रेम रहावं”

– दत्तात्रय हरगुडेने

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani