राज्यासाठी लॉकडाऊनचा निकष ठरला!; उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
राज्यात ७०० टन ऑक्सिजनची गरज भासल्यास तातडीने लॉकडाऊन

लोकवार्ता । प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राज्य निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मॉल, रेस्टॉरंट, दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत आणि खासगी कार्यालयांना २४ तास खुली ठेवण्याची मुभा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, निर्बंध शिथिल करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लॉकडाउनचा इशारा दिला आहे. तिसऱ्या लाटेचे स्वरूप दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक असण्याचा अंदाज केंद्रीय आरोग्य विभागाने वर्तविला असल्याने राज्याची ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेऊन ७०० टन ऑक्सिजनची गरज जेव्हा राज्याला भासेल तेव्हा तातडीने राज्यात लॉकडाऊन केला जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
आपल्यामुळे इतरांच्या आयुष्याला धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. सध्या निर्बंधामध्ये शिथिलता दिली असली, तरीही जबाबदारीने वागा. तिसऱ्या लाटेची शक्यता दिसल्यास पुन्हा कडक लॉकडाउन लावण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मास्क, सुरक्षित अंतर, हात धुणे ही त्रिसूत्री सर्वांनीच पाळणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले
निर्बंध शिथिल केले असते आणि तिसली लाट येनार की नाही याचा अंदाज घेत असलो तरी विषाणूच्या बदल्यात अवतारापासून सावध राहिलं पाहिजं. दुसऱ्या लाटेवेळी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे केवळ आपल्यालाच नव्हे तर देशासमोर कसं आव्हान उभं ठाकलं ते अजून ताजं आहे. राज्यातील निर्बंध किंवा लॉकडाउन लावताना ऑक्सिजनची गरज हा निकष असेल. राज्यातील कोविड रुग्णांसाठी दरररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागू लागला की राज्यात कडक लॉकडाऊन लावला जाईल. सुमारे ३० हजार रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज भासू लागली की निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.