लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

टाटा यांच्या शतक महोत्सवी स्वातंत्र्यदिनासाठी आगाऊ शुभेच्छा

स्वातंत्र्यानंतर देश प्रगतीपथावर आहे

लोकवार्ता । प्रतिनिधी

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली. इंग्रंजाच्या राजवटीतून देश १५ ऑगस्ट १९४७ साली स्वतंत्र झाला होता. भारताला स्वातंत्र्य मिळून आता एक एक वर्षे पूर्ण होत पुढील वाटचाल सुरु आहे. स्वातंत्र्यानंतर देश प्रगतीपथावर आहे. आता २५ वर्षांनी म्हणजेच २०४७ साली देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. भविष्यातील या सोहळ्याबद्दल उद्योगपती रतन टाटा यांनी आता शुभेच्छा दिल्या आहेत. रतन टाटा यांनी भारतीय नागरिकांना पत्राच्या माध्यमातून संदेश दिला आहे. मला २०४७ सालात भारतीय नागरिकांसाठी लिहिण्याची संधी मिळाली तर पुढील संदेश लिहीन, असं त्यांनी सांगितलं आहे.

२०४७ वर्षातील तरूण भारतीय नागरिकांनो, भारतात मुक्तपणे मतदान करणारी लोकशाही म्हणून मतदान करण्याऱ्या सदस्यांचं मी अभिनंदन करू इच्छित आहे. ज्यांनी सीमा आणि धार्मिक वाद शांतपणे सोडवले आहेत. मला आशा आहे की, भारतानं सत्तेत असलेल्या सरकारच्या दूरदृष्टीने आपल्या स्थिर आर्थिक धोरणांसह जागतिक आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त केलं असेल.

मला आशा आहे की, देशाचा एक भाग म्हणून तुमचं स्थान कायम ठेवाल. भविष्यात शांतता आणि आर्थिक स्थिरतेसाठी प्रयत्नशील असलेल्या सरकारच्या पाठिशी ठाम राहाल. – रतन टाटा, चेअरमन, टाटा अँड सन्स

रतन टाटा यांची कारकिर्द
उद्योगपती रतन टाटा यांनी टाटा ग्रुपमधून वयाच्या २४ व्या वर्षी कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी टाटा स्टीलच्या एका दुकानात कर्मचारी म्हणून काम केलं. भारतातील सामान्य जनतेच्या भावना टाटा व्यवस्थित जाणत होते. त्यामुळे जेआरडी टाटा यांच्यानंतर १९९१ मध्ये रतन टाटा समूहाचे पाचवे अध्यक्ष झाले. रतन टाटा यांच्या अध्यक्षतेखाली टाटा समूहाने प्रगतीची शिखरं गाठली. टाटा ग्रुपने टेटली, जग्वार लँड रोव्हर आणि कोरससारख्या कंपन्या विकत घेतल्या. सामान्य नागरिकांना परवडेल, अशी कारचं स्वप्नही त्यांनी साकार केलं. नॅनो ही सामान्य नागरिकाला परवडेल अशी कार त्यांनी बाजारात आणून स्वप्न पूर्ण केलं. रतन टाटा यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कार्याची दखल घेतल भारत सरकारने त्यांना २०० साली पद्मभूषण आणि २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani