“महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिराला फुलांची मनमोहक आरास”
– भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांची फराळ सुविधा
पिंपरी | लोकवार्ता-
महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर मंदिरात भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वतीने फुलांची मनमोहक आरास करण्यात आली. तसेच, मंगलमय वातावरणात अभिषेकही करण्यात आला. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत भीमाशंकर मंदिरात शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी आमदार महेश लांडगे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कोद्रे, जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद, जिल्हा परिषद सदस्या अपुर्वा वळसे, स्वीकृत नगरसदस्य सागर हिंगणे, विक्रांत लांडगे, संदीप पोटवडे आदी आदी उपस्थित होते.

पवित्र मानल्या जाणाऱ्या पहाटेच्या दर्शनास मध्यरात्री बारा वाजल्यापासून भाविकांची रांग लागली. महाशिवरात्रीच्या रात्री १२ वाजता शासकिय पूजा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला व दर्शनाला सुरुवात झाली.
तसेच, शिवांजली सखी मंच आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशच्या वतीने दिवसभर फराळाची सुविधा मंदिराच्या आवारात करण्यात आली. दिवसभरात सुमारे १० हजार लोकांनी फराळाचा लाभ घेतला.
