भोसरी ,आकुर्डीकरांची रात्र अंधारातच !अद्यापही वीजपुरवठा सुरळीत नाही ?
-यांत्रिक अडचणींमुळे तब्बल ६० हजाराहून अधिक ग्राहकांना फटका.
पिंपरी | लोकवार्ता-
वीज पुरवठा खंडित होणे हे पुणेकरांसाठी काही नवीन नाही.परंतु उन्हाळ्यामध्ये तापमान वाढत असताना वीज पुरवठा खंडित होणे याचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. पुण्यात आज (23 मार्च) पुन्हा विजेचा खेळखंडोबा पाहायला मिळालाय. महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे भोसरी, आकुर्डीमधील 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला. महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रातील 100 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास बिघाड झाला.

त्यामुळे भोसरी व आकुर्डीमधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांसह सुमारे साठ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या बंद आहे.महापारेषणकडून या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड शोधण्याचे काम जलदगतीने सुरु असून त्याबाबत दुपारपर्यंत स्थिती स्पष्ट होईल, असं सांगण्यात आलं आहे.