लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचे नेतृत्व भोसरीला मिळणार”

विलास लांडे किंवा अजित गव्हाणे शहराध्यक्ष होणार?

पिंपरी|लोकवार्ता-

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या जागी नवीन शहराध्यक्ष देण्याचा निर्णय राज्याच्या नेतृत्वाने घेतल्याचे समजते. त्यामुळे येत्या एक दोन-दिवसांत राष्ट्रवादीला नवीन शहराध्यक्ष मिळणार असल्याचे कार्यकर्ते बोलू लागले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करून राष्ट्रवादीचा नवीन शहराध्यक्ष हा भोसरी विधानसभा मतदारसंघातील असणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि नगरसेवक अजित गव्हाणे यांच्यापैकीच एकाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद मिळणार हे जवळपास निश्चित आहे. आमदार विलास लांडे हे थोडेसे आक्रमक, तर अजित गव्हाणे हे मवाळ राजकारणी म्हणून ओळखले जातात. पक्षनेतृत्व आक्रमक की मवाळ राजकारणाला प्राधान्य देतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. आगामी निवडणुकीत पुन्हा महापालिका ताब्यात घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी होत असल्याचे चित्र आहे. मोर्चेबांधणीचाच भाग म्हणून आता पक्ष संघटनेत खांदेपालट करण्याचा निर्णय पक्षाच्या राज्य नेतृत्वाने घेतल्याची चर्चा आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या जागी नवीन शहराध्यक्ष निवडण्यात येणार आहे. याबाबत येत्या एक-दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहराध्यक्षांसोबतच राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि महिला आघाडीतही खांदेपालट खांदेपालट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचा पुढचा शहराध्यक्ष हा भोसरी विधानसभा मतदारसंघातील असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचाच अर्थ भोसरीचे माजी आमदार विलास लांडे किंवा नगरसेवक अजित गव्हाणे यांच्यापैकी एकाला शहराध्यक्षपद मिळणार हे जवळपास निश्चित आहे. माजी आमदार विलास लांडे हे आक्रमक, तर नगरसेवक अजित गव्हाणे हे मवाळ राजकारणी म्हणून ओळखले जातात. दोघेही अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत. विलास लांडे यांच्यामुळेच अजित गव्हाणे यांची राजकीय कारकीर्द बहरली हा इतिहास आहे. भाजपचे असलेले अजित गव्हाणे यांना २००७ मध्ये राष्ट्रवादीत घेऊन त्यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणत महापालिकेचे स्थायी समिती सभापतीपद मिळवून देण्यात विलास लांडे यांचा महत्त्वाचा राजकीय वाटा राहिला आहे.

किंबहुना अजित गव्हाणे यांना स्थायी समितीचे सभापतीपद मिळाल्यानंतर विलास लांडे हे आपल्या सग्यासोयऱ्यांनाच पदे मिळवून देतात, असा राजकीय आरोपही लांडे यांनी पचवला आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदासाठी दोघांच्याही नावाची चर्चा असल्याने पक्षाचे नेतृत्व त्यातील कोणत्या नावाला पसंती देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्षपदही भोसरी विधानसभा मतदारसंघातच आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे हे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. आमदार महेश लांडगे आणि नगरसेवक अजित गव्हाणे यांच्यात राजकीय जवळीक असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे विलास लांडे आणि महेश लांडगे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. त्यामुळे विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांच्यापैकी कोणाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद मिळणार?, त्यानंतर पक्षाची राजकीय रणनिती काय असेल?, याबाब राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani