पिंपरी चिंचवड येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न
-दिव्यांगासाठी काम करण्यास कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार.
पिंपरी । लोकवार्ता-
प्रत्येक जिल्ह्यात एक तरी दिव्यांग पुनर्वसन केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी महाविकास आघाडी काम करण्यास कटिबद्ध आहे. विधानसभेच्या अधिवेशनामुळे महिनाभर मुंबई थांबावं लागलं होतं. त्यामुळे अनेक कार्यक्रम झाले नाही, आता परत हे कार्यक्रम सुरू होतील.असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.आज पिंपरी चिंचवडमधील जिल्हा रुग्णालय परिसरात दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

या दिव्यांग पुनर्वसन केंद्रात दिव्यांग व्यक्तीसाठी लागणारे विविध कृत्रिम अवयव निर्मिती होणार आहे . दिव्यांगाच्या कोशल्य विकासावर भर दिला पाहिजे. बदलत्या काळानुसार त्याच्या समोर अडचणी बदलत असतात पिंपरी चिंचवड शहरात साठ एकर जागा सामाजिक न्याय विभागाची जमीन आहे मात्र त्यावर काही ठिकणी अतिक्रमण आहे ते काढून घेऊ. दिव्यांगासाठी महाशरद पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
