आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते निगडीतल रस्त्याचे भूमिपूजन व भक्ती-शक्ती उड्डाणपुलाची पाहणी
अर्बन स्ट्रीट रस्ता भूमिपूजन,भक्ती शक्ती उड्डाणपूल पाहणी व बक्षीस समारंभ अनेकविध कार्यक्रम आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते संपन्न

लोकवार्ता।प्रतिनिधी
निगडी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक १३ यमुनानगर भागातील लोकमान्य टिळक चौक ते दुर्गा नगर पर्यंतचा अर्बन स्ट्रीट अंतर्गत विकसित रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापौर माई ढोरे ,क्रीडा सभापती उत्तम केंदळे, मनसे गटनेते सचिन चिखले,नगरसेविका सुमनताई पवळे, कमलताई घोलप,विश्व हिंदू परिषद प्रमुख शरद इनामदार , बापू घोलप,ज्येष्ठ नागरिक अण्णा अढी,नंदकुमार कुलकर्णी, विकास देशपांडे, भगवान श्राद्धे काका, बापुजी घोलप ,गोरख कोलते, ए पी कुलकर्णी, शेखर आसरकर, गिरीश देशमुख, आदित्य कुलकर्णी, प्रथमेश आंबेरकर, शिरीष जेधे, अनिल वाणी, प्रशांत बाराथे ,सारिकाताई चव्हाण, विमलताई काळभोर, निलमताई गोलार,जयश्री मकवाना आदी मान्यवर उपस्थित होते.
- या कामामुळे होणारे फायदे :
- अर्बन स्ट्रीट या कामामुळे निगडी कडून येणारी व त्रिवेणी नगर मार्गे भोसरी कडे जाणारी वाहतुक सुरळीत होण्यास मदत होईल
- या कामामुळे सायकल ट्रॅक आणि पादचारी द्वारे जाणारे नागरिक यांना सुरक्षितपणे मार्गक्रम करता येईल
- लोकमान्य टिळक चौक ते दुर्गा नगर चौक वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल
- पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल

- कामाबद्दलची माहिती
- सदर काम निखिल कंट्रक्शन करणार आहे ,
- मुख्य रस्त्याची लांबी : १५३० मी व मुख्य रस्त्याची रुंदी : २४.०० मी, इतकी
- सदर कामाची निविदा : १६ कोटी ५४ लाख
- कामाचा कालावधी : १८ महिने
- या महत्वकांशी कामाची सुरुवात आजपासून करण्यात येत आहे.
याच बरोबर प्रभागात भाजपा प्रभाग क्रमांक १३ वतीने बालमित्र व महिलांसाठी ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. बालमित्र चित्रकला विजेते- शर्वरी गोरे,प्रतीक दळवी,संस्कार कदम वेशभूषा- अवधूत पांढरे,शौर्य नांदखिले, आराध्या गोरे ,महिला वेशभूषा- रत्नमाला सारडा, पूजा मंत्री, तनवी कळसकर महिला उखाणे- साधना गांधी, पूजा सटाणकर, साक्षी दळवी यांना मिळाले या स्पर्धेचे परीक्षक निफाडकर मॅडम यांनी काम पाहिले
तसेच आमदार महेशदादा लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील आकर्षण भक्ती-शक्ती उड्डाणपुलाची पाहणी केली त्यावेळी नगरसेविका शर्मिला बाबर,भाजपाचे अनुप मोरे,पालिकेचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे व विजय भोजने उपस्थित होते याबाबत आमदार महेश लांडगे यांनी भक्ती शक्ती पुलाविषयी असणाऱ्या उणीवा, तक्रारी याबाबत अनेक सूचना देऊन उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.