लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“शाहू सृष्टी तयार करण्याचा भुमिपुजनाचा कार्यक्रम खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आला”

पिंपरी ।लोकवार्ता-

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र.10 मधील क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याशेजारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणे व सुशोभिकरण कामांचा तसेच के. एस. बी. चौक शाहुनगर येथे राजश्री शाहू महाराजांच्या पुतळयाजवळ शाहू सृष्टी तयार करण्याचा भुमिपुजनाचा कार्यक्रम प्रमुख पाहूणे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आला.पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे केऐसबी चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यामागे शाहू सृष्टी उभारण्यात येत आहे. येथे राजर्षी शाहू उद्यान विकसित करण्यात आले असून याचा पुनर्विकास करण्यात येत आहे. शाहूसृष्टी उभारण्याच्या या ऐतिहासिक कामाचे भूमिपूजन छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते आज मंगळवार (दि.२३) सकाळी १०:३० वाजता करण्यात आले. भूमिपूजनाचा कार्यक्रच्या वेळी भोसरी विधानसभेचे मा.आमदार महेश दादा लांडगे, मा.महापौर श्रीमती उषाताई उर्फ माई मनोहर ढोरे,नितीन लांडगे यांसोबत त्यांचे सहकारी व मान्यवर उपस्तिथ होते.

२.५ एकर क्षेत्रफळावर हे उद्यान पसरलेले आहे.शाहू सृष्टी छत्रपती शाहू महाराजांच्या पराक्रमाचे प्रतिबिंब असेल.सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी महाराजांनी केलेले विविध योगदान यात दाखवले जातील.लँडस्केप थीममध्ये मोकळ्या वाहत्या जागांची निर्मिती, महाराजांच्या जीवन आयामाचा आदर करणारी शिल्पे असलेली विविध लहान जागांद्वारे जोडली जातील. मोठा तलाव असेल ज्यामध्ये २ हत्तींची शिल्पे ठेवली जातील. हत्तींची लढाई एक खेळप्रेम असल्याचे चित्रित केले जाईल.२ लढाऊ कुस्तीपटू सुदृढ समाजासाठी खेळाला चालना देण्यासाठी दिलेल्या योगदानाचे चित्रण असेल.शेती करणारे बैल, सुतार इ.शिल्पे असतील.

कोल्हापुर पॅलेस प्रमाणे स्थापत्य शैलीत बेसाल्ट दगडाच्या भिंतीने एंट्री गार्डन बंदिस्त असेल.स्वागतार्ह प्लाझा ज्यामध्ये कॅन्टीन, देखभाल क्षेत्र आणि इतर कार्ये असतील.मुख्य प्रवेशद्वार तोफेसह तटबंदी, तिकीट बूथ असेल. पहिल्या टप्प्यात १३ कार आणि ६५ दुचाकी असलेले पार्किंग क्षेत्र विकसित करण्यात आले आहे.तसेच बागेला विविध थीममध्ये विभाजित करणाऱ्या भिंती बांधल्या आहेत.दुस-या टप्प्यात पुतळ्याभोवतीचा पुढचा भाग विकसित करणे, शिल्पे उभारणे आणि भित्तीचित्र (Mural) बसवणे ही कामे केली जातील.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani