म्हाडाकडून पुणेकरांसाठी मोठं गिफ्ट; तब्ब्ल ४ हजार ७४४ घरांची सोडत पुण्यात
पुणे विभाग अधिकारी नितीन माने पाटील यांची माहिती.
पुणे । लोकवार्ता
पुण्यामध्ये स्वतःची घर असण्याची स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आता म्हाडा कडून खास ऑफर आली आहे. म्हाडा पुण्यामध्ये तब्ब्ल चार हजार सातशे घरांची सोडत करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काही दिवसांत म्हाडा पुणे विभागासाठी घरांची सोडत काढणार आहे. यात तब्बल साडेचार हजारपेक्षा जास्त घरं असणार आहेत. पुण्यासह पिंपरी चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागातील घरांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आलाय. म्हाडाचे पुणे विभागाचे अधिकारी असलेल्या नितीन माने पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुणे विभागासाठी तब्बल 4 हजार 744 इतक्या घरांची सोडत काढली जाणार आहेत. येत्या काही दिवसांत त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर गृहस्वप्न साकार करण्याचे स्वप्न पाहिलेल्यांना लॉटरीसाठी अर्ज भरता येऊ शकेल.

गेल्या दोन वर्षांत म्हाडाने काढलेली पुणे विभागातली ही चौथी सोडत आहेत. तर गेल्या काही वर्षांत पुणे म्हाडा विभागाकडून अनेक सोडती जाहीर करण्यात आल्यात. आता काढली जाणारी ही दहावी सोडत असणार आहेत. पुणे म्हाडा विभागात घर घेण्यासाठी मुंबई पुण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील अनेकजण इच्छुक असण्याची शक्यताय. आता अनेकांना यासाठीची जाहिरात कधी निघते याची प्रतिक्षा आहे.