मोठी बातमी ! संजय राऊतांना जामीन मंजूर; राऊतांच्या आईंना भावना अनावर
लोकवार्ता : गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे.

पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ऑगस्ट महिन्यात संजय राऊतांना ईडीने अटक केली होती. त्यावेळेपासून १०२ दिवस राऊत तरुंगात होतो. संजय राऊत तुरुंगात असताना ठाकरे गटाची भूमिका मांडणारा प्रभावी वक्ता नसल्याची चर्चा होती. मात्र, आता राऊत तुरुंगातून बाहेर आल्यास ते पुन्हा जोमाने ठाकरे गटाचा अजेंडा लोकापर्यंत पोहोचवण्याचं काम कराताना दिसणार आहेत.
मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती देशपांडे यांच्यासमोर पार पडली.
हा निकाल येताच राऊत आणि शिवसेना- ठाकरे गटाच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी अनेकांच्या नजरा राऊतांच्या कुटुंबीयांकडे आणि प्रामुख्यानं त्यांच्या आईकडे गेल्या. लेकाला जामीन मिळाल्याची बातमी कळतात राऊतांच्या आईला भावना अनावर झाल्या.