लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“नगरसेवक तुषार कामठे यांचाही भाजपाला राम-राम”

-एका पाठोपाठ ३ नगरसेवकांनी दिला राजीनामा…..भाजपचे मोठे नुकसान

पिंपरी | लोकवार्ता-

काही दिवसांपूर्वी मोशीचे नगरसेवक वसंत बोराटे यांनीहि राजीनामा दिला , पाठोपाठ आमदार लक्ष्मण जगातप यांच्या खंद्या समर्थक पिंपळे गुरवच्या नगरसेविका चंदा राजू लोखंडे यांनीही दोनच दिवसांपर्वी भाजपाला रामराम केला. आता पिंपळे निलखचे धडाडीचे नगरसेवक तुषार कामठे यांनी गुरुवारी आपल्या नगरसेवकपदाचा आणि भाजपाच्या त्याग केला आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अजित गव्हाणे यांच्याकडे आल्यानंतर ही तिसरी विकेट असून आणखी २२ नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याने सत्ताधारी भाजपाचे नेते, पदाधिकारी हादरले आहेत.

नगरसेवक तुषार कामठे यांनी आपला राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे देतेवेळी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मुख्य प्रवक्ते योगेश बहल, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे उपस्थित होते. महापालिका निवडणूक दोन महिन्यांवर आहे. महापालिकेची मुदत १३ मार्च पर्यंत असून नंतर प्रशासक नियुक्त कऱण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तत्पूर्वी पक्षांतर केले तर नगरसेवकावर कायदेशीर कारवाई होऊ शकते म्हणून सरळ नगरसेवकपदाचा राजीनामा देणे अनेकांनी पसंत केले आहे. पुढच्या आठवड्यात घाऊकपणे मोठ्या संख्येने राजीनामे घेऊन भाजपाची कोंडी करायची राष्ट्रवादी काँग्रेसची व्युहरचना आहे. नगरसेवक तुषार कामठे यांचा राजीनामा हा चिंचवड मतदारसंघातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना थेट आव्हान असल्याचे समजले जाते.

काम न करताच १२२ कोटी रुपये लुटले –
नगरसेवक तुषार कामठे यांनी गेल्या पाच वर्षांत महापालिकेती भाजपाच्या चुकिच्या कामां विरोधात आवाज उठविला. पीसीबी टुडेशी बोलताना कामठे म्हणाले, आमदारांच्या हुकूमशाहीला कंटाळून मी नगरसेवकपदाचा राजीनामा देतो आहे. अत्यंत चुकिच्या पद्धतीने यांनी कामे केली आणि महापालिका लुटली. चुकिच्या कामांची यादी मोठी आहे. त्यात ठळकपणे सांगता येण्यासारखी कामे म्हणजे स्मार्ट सिटीचा घोटाळा हा सर्वात मोठा आहे. धक्कादायक बाब म्हणजे आमदारांच्या पाहुण्यांचेच अनेक ठेके आहेत. सर्वात मोठा भ्रष्टाचाराचे एक उदाहरण म्हणजे एसटीपी प्लॅंन्ट. काम न करताच पैसे उकळले आहेत. १४१ कोटींच्या कामापैकी १२२ कोटी रुपये अक्षरशः काम न करता उकळले. आमदारांच्या पीए नेसुध्दा पालिका धुतली. आम्हा त्या विरोधात आवाज टाकला तर आमची मुस्काटदाबी केली. पाच वर्षे आमच्यावर अघोषित बहिष्कारच होता आता मोकळे झाल्यासारखे वाटते. यापुढे आणखी उघडपणे पुराव्यांसह मी सर्व प्रकऱणे बाहेर काढणार आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani