भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर..मात्र यावेळेसही पंकजा मुंडे यांना डावललं
-पंकजा मुंडे समर्थकांमध्ये नाराजी.
पुणे । लोकवार्ता
भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना डावलन्यात आल आहे. भाजपने नुकतीच पाच अधिकृत उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. प्रवीण दरेकर , राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे पाच उमेदवार भाजपतर्फे विधान परिषदेची निवडणूक लढवतील.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच बिहार या तिन्ही राज्यातील आगामी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक-2022 साठीची नाव जारी केली आहेत. यात महाराष्ट्रातील या पाच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या नावांत पंकजा मुंडेंचं नाव नसल्यामुळे पंकजा समर्थकांमध्ये नाराजी आहे. उमेदवारीची संधी मिळाल्यास या संधीच सोन करेन, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं. मात्र यंदाही त्यांची संधी हुकलेली दिसतेय.