“भाजप नगरसेविका माया बारणे यांचाही राजीनामा “
-राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द .
पिंपरी | लोकवार्ता-
नगरसेवक वसंत बोराटे यांनी राजीनामा देत आमदार महेश लांडगे यांना धक्का दिला, तर पाठोपाठ दुसरे नगरसेवक तुषार कामठे यांनी आणि लगेचच नगरसेविका चंदा लोखंडे यांनी राजीनामा देऊन आमदार लक्ष्मण जगताप यांना झटका दिल्याने भाजपा गोटात मोठी खळबळ उडाली. सुमारे २२ नगरसेवक भाजपा सोडून राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत असल्याची वार्ता आहे. आता माया बारणे यांनीही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत पक्ष सोडल्याने राजकिय वातावरण तापले आहे.

महापालिका निवडणूक दीड महिन्यांत होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. त्या पार्श्वभूमिवर भाजपा नगरसवेकांचे राजीनामा सत्र सुरू आहे. भाजपा सोडणाऱ्या नगरसेवकांनी दोन्ही आमदारांवर खापर फोडले आहे. आमदारांच्या मनमानी, हुकूमशाहीवर हे नगरसेवक नाराज आहेत. भाजपाला लागलेली गळती रोखण्यासाठी वरिष्ठ नेतेमंडळींचा आटापीटा सुरू आहे, पण त्यांना यश मिळताना दिसत नाही.
माया बारणे यांच्या राजीनामा हा महत्वाचा समजला जातो. त्यांचे पती माजी नगरसवेक संतोष बारणे यांनीही भाजपा सोडला आहे.
माया बारणे या थेरगावमधून दुसऱ्यांदा नगरसेविका होऊनही त्यांना पाच वर्षांत एकही महत्वाचे पद मिळाले नाही. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्वाच्या पदांचे आश्वासन दिले पण जाणीवपूर्वक त्यांना डावलले गेले. माया बारणे यांनी भाजपाच्या नेत्यांवर खापर फोडले आहे. महापालिकेतील आमदारांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल माया बारणे यांच्यासह नगरसेवक तुषार कामठे यांनी तुफानी हल्ला चढविल्याने राजकारण तापले आहे. तिसरीकडे भोसरीतून बिनविरोध भाजपा नगरसेवक झालेले रवि लांडगे यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या गैरकारभार आणि हुकूमशाही कारभाराबद्दल माध्यमांतून आरोप केल्याने भाजपा त्रस्त आहे.