भाजप सोडण्याच्या तयारीत असलेल्यांना आमदार जगताप व लांडगे यांचा ठेंगा!
भाजपातील २५ नगरसेवक फुटण्याची भाकीते फसली.
पिंपरी|लोकवार्ता-
२०१७ साली प्रथमच पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक भाजपने जिंकली. गेल्या पावणे पाच वर्षात प्रत्येक नगरसेवकाला त्यांनी पद देण्याचा प्रयत्न करून . त्यासाठी स्थायी समिती सदस्यत्वाचा दोन वर्षाचा कालावधी त्यांनी आपल्या सदस्यांसाठी एक वर्षाचाच केला. शहर कारभारी आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांनी पद न मिळालेल्या आपल्या कट्टर नगरसेवकांना पीएमआरडीएच्या (PMRDA) नियोजन समितीवर दोन महिन्यांसाठी का होईना संधी दिली. पण जे उमेदवार पक्ष सोडण्याच्या तय्यारी मध्ये होते त्यांना मात्र आमदार महेश ठेंगा दाखवलाय.

भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लांडगे यांनी २०१७ मध्ये महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर आपल्या सर्व समर्थकांना विविध पदांवर संधी दिली. मात्र, नगरसेवक बोराटे आणि गायकवाड यांना महत्त्वाचे पद दिले नव्हते. त्यामुळे ते नाराज चर्चा . मात्र, शेवटच्या टप्प्यात आपल्या या दोन्ही समर्थक नगरसेवकांना थेट पुणे जिल्ह्यासाठी काम करणाऱ्या नियोजन समितीवर काम करण्याची संधी लांडगेंनी उपलब्ध करुन दिली. त्यातून त्यांनी राजकीय ‘कमिटमेंट’ चे आपले वर्तूळ पूर्ण केले, अशी भावना त्यांच्या समर्थकांत आता व्यक्त होत आहे.