लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“आमदार महेशदादा लांडगे ब्लू-टिक असलेले शहरातील प्रथम आमदार”

जनतेच्या हितासाठी आणि विकास कामांसाठी लागेल ती पायरी चढेन-भाजप आमदार महेश लांडगे.

पिंपरी|लोकवार्ता-

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे हे सोशल मीडिया वर सतत आत्मसात असतात. कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर असलेल्या महेश लांडगे यांच्या फेसबुक फेजला जवळपास दोन लाख नागरिक फॉलो करत आहेत. तर 1 लाख 48 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पेजला लाईक केले आहे. त्यामुळे, फेसबुककडून लांडगे यांच्या पेजचे (मंगळवारी) ब्ल्यू-टिक वेरिफिकेशन झाले आहे. या टिक मुळे महेश लांडगे यांची प्रसिद्धी वाढण्यास आणखी मदत होईल .

महेश लांडगे हे पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे भाजपचे तरुण,व कर्तव्यदक्ष आमदार आहेत. आमदार बनण्याची हि त्यांची दुसरी वेळ असून पिंपरी चिंचवड मध्ये सर्वात प्रसिद्ध असेलेले एकमेव आमदार देखील आहे.ते पैलवानदेखील आहेत.सुरुवातीला ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते नंतर २०१७ मध्ये भाजप मध्ये प्रवेश करून त्यांनी पहिलीच निवडणूक आपल्या नावावर करून घेतली. २०१९ च्या निवडणूकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावार जोरदार विजय मिळविला होता. 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे, भाजपच नव्हे तर राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेससह अन्य पक्षातील नेतेही आमदार महेश लांडगे यांचे चाहते असल्याची चर्चा पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तूळात रंगू लागली आहे.

lokvarta
lokvarta

महेश लांडगे यांच्या फेसबुक पेजला ब्ल्यू-टिक वेरिफिकेशन झाल्याने पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात मोठा चाहता वर्ग असल्याचे दिसून येते. कारण पिंपरी चिंचवड शहरात भाजपचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक असे एकूण तीन आमदार आहेत. परंतू, अद्याप यापैकी एकाही आमदाराला सोशल मिडियावर एवढी मोठी प्रसिद्धी मिळालेली नाही.लांडगे हे शहरातील विकास कामांसह सोशल मिडियावरही नेहमीच अक्टिव्ह असतात. त्यामुळे, त्यांच्या फेसबुक पेजला फेसबुक फेजला 1 लाख 90 हजारांपेक्षा अधिक नागरिक फॉलो करत आहेत. तर 1 लाख 48 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पेजला लाईक केले असून पिंपरी चिंचवडकरांनी साथीमुळे पेजला आज ब्ल्यू-टिक वेरिफिकेशन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
फेसबुक पेजने ब्लू टिक दिल्यामुळे महेश लांडगे यांनी सर्वप्रथम पिंपरी चिंचवड च्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले.पिंपरी चिंचवड आणि पुणेच नव्हे तर राज्यातील जनतेचे माझ्यावर किती प्रेम आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. खरतरं जनतेच्या साथीमुळेच आज फेसबुक पेजला ब्ल्यू-टिक वेरिफिकेशन झाले आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो .चिंचवडकरांच कौतूक शब्दात व्यक्त करण्यापलीकडे आहे. जनतेच्या हितासाठी आणि विकास कामांसाठी लागेल ती पायरी मी चढेन, तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या, अशा भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani